त्यांच्या पायाखालची जमीन हादरली... जमिनीत एक मोठं भोक पडून तिथे एक खोल खड्डा तयार झाला. या तिन्ही मुली एकत्र उभ्या असल्यामुळे त्या खड्ड्यात पडल्या. त्या ओरडण्याआधीच खड्डा पटकन बंद झाला आणि माती पुन्हा पहिल्यासारखी झाली. मॅजिकल ट्रॅपनं त्याचं काम चोख पार पाडलं होतं, पण त्या मुलींचं पुढे काय झालं ?