दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... इंद्रियंतृप्ती करणं, त्यातच अडकल्यामुळे मरेपर्यंत अनेक चिंतांनीच ग्रासून जाणं, कामक्रोधांमधे आणि इंद्रियतृप्तीमधेच अडकणं, अविवेकी मार्गानं धनसंचय करणं, उत्तरोत्तर अधिकाधिक धनाचीच अपेक्षा बाळगणं, मौजमजेलाच जीवन समजणं, अविचारी संकल्पांनी भ्रान्त होऊन मोहाच्या जाळ्यात अडकणं; आणि अखेरीस नरकाला प्राप्त होणं हे असुरी मनुष्याचं जीवन आणि मृत्युपश्चात गंतव्य ठिकाण असतं.