दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... जे कधी पाहिलं नाही, ज्याचं वर्णन कधी ऐकलं नाही, जे कधी जाणलं नाही त्या अव्यक्त ब्रह्माचा शोध घेणं म्हणजे दुःसाहस करण्यासारखं असतं. तो मार्ग अतिशय क्लेशकारक असतो. अर्थात, निर्गुण ब्रह्माची उपासना अतिकठीण असते. तरीही ती कष्टसाध्य मात्र नक्कीच आहे.