दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... जे कुणी या शाश्वत, अनिर्देश्य, अव्यक्त, सर्वव्यापी, अचिंत्य, कूटस्थ, अचल आणि अढळ अशा अक्षर निर्गुण ब्रह्माची सर्व इंद्रियांचा संयम करून, सर्वत्र समबुद्धी ठेवून आणि सर्व प्राणिमात्रांच्या हितार्थ तत्पर राहून उपासना करतात ते सुद्धा मलाच प्राप्त होतात, असं भगवान सांगतात.