दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... ब्रह्म हे आद्यतत्त्व आहे. ते तत्त्व स्वयंभू आहे. अव्यक्त आणि अक्षर प्रकृतीच्याही ते पलीकडे आहे. प्रत्यगामाच्या रूपाने प्रत्येक देहात हेच ब्रह्म स्थित असतं. त्या ब्रह्माला ओळखण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच अध्यात्म असतं. तर, चराचराची उत्पत्ती करणारा जो विसर्ग तेच कर्म असतं.