AUDIOBOOK

Vainatey-Ek Garud Yoddha

Pratik Puri
(0)

About

.त्या कर्कश शिट्टया.ते विचित्र आवाज.ती खिडकी.तिनं भीत भीत त्या खिडकीकडे एक नजर टाकली.तिला हळूहळू आठवत गेलं काल रात्री तिनं काय पाहिलं ते. तिनं घाबरल्या नजरेनं वैनतेयकडे पाहिलं. अंधारात स्पष्ट काही दिसत नव्हतं. पण जे काही दिसलं त्यानं तिला भयचकित केलं. वैनतेयची गादी ठिकठीकाणी फाटली होती. त्याच्या अंगावरची चादर त्याच्या पायांत गुंतली होती आणि.आणि जिथे जिथे ती फाटली होती त्यातून लांब, तीक्ष्ण, वाकडी नखं दिसत होती.आणि त्याच्या हाताच्या मागच्या बाजूने पंख दिसत होते.'' मनुष्य आणि सुवर्ण-गरुडांचे गुणधर्म असणाऱ्या वैनतेयच्या आयुष्यात पावलोपावली संकटं आहेत. सर्प विश्वातील सर्प आणि कापालिक गुरू शतचंडी तर त्याच्या जीवावर उठले आहेत. वैनतेय अलौकिक शक्ती लाभलेला एक चिमुरडा अनाथ मुलगा ! एक गरुड योद्धा ! एका लहान मुलाचा अतिमानव होईपर्यंत विलक्षण प्रवास. . सर्प आणि गरुड-मानवांमधिल प्राचीन संघर्षाची हि अद्भूत कथा .

Related Subjects

Artists