AUDIOBOOK

About

नलुचं लग्न ठरवायचं ठरलं आणि स्थळं पहाण्यासाठी जी स्थळयात्रा सुरू झाली ती अनेक अनुभव देत राहिली. एखादे गुलबकावलीचे फूल शोधावे त्याप्रमाणे योग्य स्थळाचा शोध किती रंजक असतो याचा वेधक शोध दि.बा.मोकाशी यांनी या कादंबरीतून घेतला आहे. पूर्वी वरसंशोधनासाठी जोडे झिजवणे आणि वधूपरिक्षेचे विचित्र अनुभव घेणे काय होते हे ऐकताना तर समजतेच पण आजही लग्न ठरवणे हा किती मोठा बाजार आहे ते कळते. कुटुंबात कधी मुलगी लग्नाची असते, कधी मुलगा. तेव्हा आपल्या कुटुंबात केव्हातरी मुलीचेही लग्न निघणार याची जाणीव ठेवून जर प्रत्येकाने वधूपरिक्षा केली तर वरसंशोधनातील आजची कटुता व बाजारुपणा खात्रीनं कमी होईल.

Related Subjects

Artists