AUDIOBOOK

Kaamsutrakaar Vaatsayan

Di. Ba Mokashi
(0)

About

कामसूत्रकार वात्स्यायन' ही त्यांची १९७८ मध्ये प्रकाशित झालेली चरित्रात्मक कादंबरी. मोकाशींची कादंबरीतील कित्येक प्रगल्भ विधाने मनात रुतून राहावीत अशी आहेत..
'स्त्री-पुरुष संबंधाचा अपत्य हाच तेवढा शेवट राहतो. बाभ्रव्याचे कामशास्त्र जिथे थांबते, तिथे खरे जीवन सुरू होते. कारण कामशास्त्राला पुढे हेतूच राहत नाही.'मोकाशींनी या कादंबरीत वात्स्यायनाने हा ग्रंथ कसा लिहिला याची कहाणी सांगितली आहे.
कामसूत्र' ग्रंथाचा हेतू वासना उत्तेजित करणे हा नव्हता, तर त्याच्याकडे शास्त्रशुद्ध पद्धतीने पाहणे हा होता. ब्रह्मचर्य व परम समाधी या दोन्ही गोष्टींचा विचार त्याने केला होता. एका बाजूला महर्षी पतंजलींनी योगसूत्रांचे संपादन केले आणि त्या काळाच्या आसपासच केव्हातरी वात्स्यायनाने ही रचना केली. भारतीय परंपरेच्या या सर्वसमावेशकतेला जगात तोड नाही असेच म्हणावे लागेल. इतर अनेक श्रेष्ठ प्राचीन भारतीय व्यक्तींप्रमाणे वात्स्यायनाचीही निश्चित ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही. प्राचीन भारतीय परंपरेतली इतिहासलेखनाविषयीची अनास्था सर्वपरिचित आहे.

Related Subjects

Artists