AUDIOBOOK

About
फास्टर फेणेची म्हणजेच बनेशची शाळा - विद्याभवननं क्रिकेटच्या मॅचमध्ये दोन विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला होता. दुसऱ्या दिवशी त्याच्या शाळेत चर्चा होती ती या मॅचचीच. शेख सरांच्या तासालाही, त्यांनी प्रत्येकाला या मॅचबद्दलच विचारलं. बनेशला नेमकं मॅचबद्दल काही सांगता आलं नाही, कारण हा पठ्ठ्या मॅच बघायला हजरच नव्हता मुळी! बनेशनं खरं काय ते सरांना सांगितलं...पण शेख सर त्याच्यावर जाम भडकले, काहीबाही बोलले, त्यामुळं अपमानित वाटून तिथून निघून रस्ता दिसेल तिकडे तो चालत सुटला. पण सरांच्या तावडीतून सुटलेला फाफे वेगळ्याच रस्त्यावर असताना अचानक आलेल्या चक्रीवादळात मात्र पुरता अडकला. मग पुढे काय झालं? फाफेनं या चक्रीवादळाचा सामना कसा केला? तो या संकटातून सहीसलामत वाचला का? हे प्रश्न पडले असतील, तर त्यांची उत्तरं मिळवण्यासाठीच ऐका 'चक्रीवादळात फास्टर फेणे' अमेय वाघसोबत.