AUDIOBOOK

Anand Ovari

Di. Ba Mokashi
(0)

About

कान्ह्या! सावध! इतका दंग होऊ नकोस. हा तुझा मार्ग नव्हे. मग हा तुकाचा मार्ग आहे का? मी आठवू लागलो... लहानपणी तुका आमच्या बरोबर आमच्या प्रमाणे सर्व खेळ खेळ्ला होता. मग तो दुकानात बसू लागला. मग आमचे आई वडील गेले. आणि मागचे आठवताना नकळतच तुकाने स्वत:चे चरित्र सांगितले ते आठवले.चरित्र सांगण्याचा हा प्रसंग आनंद ओवरीवर घडला. आमच्या देवळाच्या ओवरीला आनंद ओवरी म्हणत. इथे आमचे बालपण हुंदडले. जाणतेपण गरजले. इथे बसून तुकाने अभंग लिहिले आणि पुष्कळदा तुका आणि त्याचे सहकारी इथेच अभंग संकीर्तन करीत. एका रात्री कीर्तन संपलं. तुकाच्या सहकाऱ्यांनी बराच आग्रह केलाकी, बोवा तुमचे चरित्र ऐकायचे आहे. तेव्हा संकोचाने पंधरावीस अभंगांतून तुकाने ते संक्षेपाने सांगितले, तुकयाबंधू म्हणून, कान्होबा म्हणून....तुकारामाचे चरित्र मी या आनंदओवरीतून सांगत आहे....

Related Subjects

Artists