AUDIOBOOK

About
राइट, ऑर्व्हिल : (१९ ऑगस्ट १८७१-३० जानेवारी १९४८). विमानविद्येतील आद्य अमेरिकन संशोधक बंधू. त्यांनी १९०३ मध्ये हवेपेक्षा जड अशा विमानाची पहिली यशस्वी शक्तिचलित, अविरत व नियंत्रित उड्डाणे साध्य करण्याचे आणि १९०५ मध्ये पहिले पूर्णपणे व्यवहार्य विमान तयार करण्याचे व उडविण्याचे महत्कार्य केले.सुधारित राइट विमाने १९१० व १९११ मध्येही प्रचारात आली व त्यांचे उड्डाणही उत्तम होत असे परंतु त्यानंतर यूरोपीय प्रतिस्पर्ध्यांनी त्यांना मागे टाकले. बिल्वर हे डेटन येथे आंत्रज्वराने (टायफॉइडने) मृत्यू पावले. ऑर्व्हिल यांनी १९१५ मध्ये राइट कंपनीतून आपले अंग काढून घेतले. आपले उर्वरित आयुष्य त्यांनी मुख्यत्वे विमानविद्येतील संशोधनाकरिता खर्च केले. विमान उद्योगाची सुरूवात करणा-या राईट बंधूंच्या चरित्राबद्दल सर्वांनाच उत्सुकता असते. इथे जाणून घेऊया त्यांनी ही भरारी कशी घेतली...